यापुढे निवडणूक होणार नाही; सर्वसहमतीने संमेलनाध्यक्ष निवडणार!

नागपूर :रायगड माझा 

आखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक घेतली जाणार नाही. यापुढे सर्वसहमतीने संमेलनाच्या अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षामध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी वाद होत राहिले. त्यामुळे या निर्णयामुळे या वादाला पुर्णविराम मिळेल.

आखील मराठी महामंडळाच्या नागपूरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून साहित्य महामंडाळाने निवडणूक न घेण्याबाबत घटनादुरूस्ती केली असून घटक संस्थाची मान्यता मिळाल्यानंतर यांची अंमलबजावणी करण्यात येईल.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत