यावर्षी मुंबई तुंबली तर जबाबदारी राज्य सरकारची : महापौर

रायगड माझा वृत्त : मुंबई

Image result for विश्वनाथ महाडेश्वर

यंदा मुंबई तुंबली तर जबाबदारी राज्य सरकारची असेल. मुंबई महापालिका शहर तुंबण्याला जबाबदार राहणार नाही, असं विधान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलं आहे.मुंबईत मेट्रोची कामं सुरु आहेत. यादरम्यान, पर्जन्यजलवाहिन्या उखडल्या गेल्या होत्या, त्या पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणांची आहे. मेट्रोच्या कामामुळे जर मुंबई तुंबली तर जबाबदारी महापालिकेची नाही, असं महापौरांनी स्पष्ट केलं.

आतापर्यंत मुंबईतली नालेसफाई 50% ही झालेली नाही. येत्या दहा दिवसांत पुन्हा नालेसफाईचा पाहणी दौरा होणार आहे. तोपर्यंत काम पूर्ण झालं नाही तर संबंधित ठेकेदारांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिला आहे.

मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. पावसामुळे मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये 13 जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत