या आधीच्या रायगडच्या नेतृत्वाने फक्त स्वःताचाच विकास केला – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

रोहे : महादेव सरसंबे

या देशात काँगेस राष्ट्रवादीची सत्ता होती ते सरकार पुर्ण पणे भ्रष्ट्राचाराने बरवटलेले होते.किती लुटता येर्इल तेवढे लुटले, कोळशाने हात काळे केले.या उलट या देशात दिवंगत अटलजीनी टेलिकॉम क्रान्ती आणली.आज या राज्यात जलयुक्तशिवाराच्या माध्यमातून 2400 गावे दुष्काळ मुक्त झाले आहेत.देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर महाराष्ट्रात धरणे बांधली.परंतु या आधी रायगड जिल्हयाचे नेतृत्व रोह्याचे होते.कोटयावधीचा निधी रायगड जिल्हयात आला.त्यावेळी त्यांनी फक्त आपला विकास केला.रायगड जिल्हयातील पावसाचे पाणी थांबवले असते तर आज पाणी टंचार्इ नसती.हे काम त्यांनी केले नाही.त्यांनी तालुक्याचा नुकासान केला आहे.कंत्राटी कामगारांवर आन्याय झाला आहे.किमान वेतन मिळत नाही.त्यामुळे हा आन्याय आम्ही कधापी सहन करणार नाही.अमित घागच्या माध्यमातून या समस्या आमच्याकडे येऊ द्या आम्ही कंत्राटी कामगारांना न्याय देण्याचे काम करू असे जिल्हयाचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी ज्येष्ठ नागरीक सभागृहात तरूण कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी व्यक्त केले.

या वेळी सिडकोचे अध्यक्ष व रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष सतिष धारप, लोकसभा विस्तारक अविनाश कोळी, अलिबाग विधानसभा मतदार संघ अध्यक्ष अ‍ॅड महेश मोहीते, श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष कृष्णा कोबनाक, समन्वय समिती अध्यक्ष संजय कोनकर, नवनियुक्त भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, कामगार सेलचे विवेक अभ्यंकर, रविंद्र कोरडे, विजय मालपकर, शहर अध्यक्ष भार्गाव पाटील, महीला जिल्हा उपाध्यक्ष मेघना ओक, धनश्री बापट, नामदेव वाघमारे, राजेश डाके, श्रध्दा घाग, अरूण वाघमारे, कृष्णा बामणे, जयेश माने, नरेश कोकरे, स्वप्नील वाळंज, निलेश धुमाळ, योगेश जाधव, विलास डाके, तुषार मोरे, कुणाल पिटनार्इक, श्रीकांत जंगम, भरत महाडीक आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी पालकमंत्री चव्हाण यांनी भाजप पक्ष हा फक्त देशाचा विचार पहीला करतो.या पक्षात सगळे कार्यकर्ते स्वताला समजतात.ते सगळे देश उभारण्यासाठी राष्ट्र घडविण्यासाठी काम करीत असतात.या देशाला महसत्ताक बनविण्यासाठी आपण सर्वांनी भाजपच्या प्रवाहात सामिल व्हा.या पक्षात पहीले राष्ट्राचा विचार नंतर पक्षाचा विचार व शेवटी स्वताचा विचार केला जात असल्याचे सांगितले.
आ.प्रशांत ठाकूर यांनी पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी रायगड जिल्हयाला 300 कोटी चा आराखाडा पाणी योजनासाठी मंजुर करून घेतले.असा सक्षम पालकमंत्री रायगड जिल्हयाला मिळाला आहे.या उलट या अधी रोह्याचे पालकमंत्री होते.15 वर्ष रायगडच्या राजकारणाचे केंद्र बिंदु रोहा हे होते.

विकासाच्या नावावर नारळ फोडयाचे व ते नंतर कुंडलिका नदीच्या पात्रात सोडायाचे हे काम केले आहे.त्यांनी विकासाच्या आड बंद तयार केले होते.हे बंद तोडण्याचे काम आताचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी केले आहे.खोटी आश्वासने त्यावेळी दिली होती त्याची मालिका खंडित करण्याचे काम तुम्हा आम्हाला करायचे आहे.सक्षम पालकमंत्री रायगड जिल्हयाला मिळाला आहे.ते रायगड जिल्हयात राहात नसतील तरी सुध्दा रोहृातील कारखान्याला लागलेली आग असो, महाड येथील एम.आय.डी.सी.मधील घटना अन्यथा पोलदपुरची घटना या सगळयांच्या वेळी पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण त्वरीत भेट घेतली.असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमात तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग यांची जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी तर प्रकाश मोरे यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.नागोठणे विभाग सरचिटणीसपदी ज्ञानेश्वर शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली असुन त्यांना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.या कार्यक्रमात रोहा तालुक्यातील शेकडो तरूणांनी भाजप पक्षात प्रवेश केले आहे
या वेळी संजय कोनकर यांनी मनोगत, अमित घाग प्रास्ताविक व अभार सोपान जांभेकर यांनी मानले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत