‘या’ आयपीएस अधिकाऱ्यावर महिला झाली फिदा

उज्जैन : रायगड  माझा

फिल्मस्टार, क्रिकेटपटू यांच्यावरील प्रेमापोटी त्यांना भेटण्यासाठी तरुण तरुणींनी घर सोडल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले, वाचले असेल. पण एका हँडसम पोलीस अधिकाऱ्यावर फिदा झालेल्या एका महिलेने घरदार सोडून त्याला भेटण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये धाव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पंजाबमधील होशियारपूर येथील 27 वर्षीय महिला उज्जैन येथे कर्तव्यावर असलेले आयपीएस अधिकारी सचिन अतुलकर यांच्या प्रेमात पडली. त्यांना भेटण्यासाठी या महिलेने पंजाबहून थेट मध्यप्रदेश गाठले. अतुलकर यांना भेटण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिचे समुपदेशन करून तिला परत घरी पाठवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे.

महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी रेखा वर्मा यांनी सांगितले की, “ही महिला एसपी सचिन अतुलकर यांना भेटण्याचा प्रयत्न करत होती. तसेच ती त्यांच्या कार्यक्रमांमध्येही पोहोचली होती. या महिलेच्या पालकांना आम्ही बोलावून घेतले आहे. मात्र ती त्यांच्यासोबत जाण्यास तयार नाही.”

आपण रस्ता चुकून उज्जैनला आल्याचा दावा या महिलेने केला आहे. मात्र एसपी सचिन अतुलकर यांना भेटण्याच्या हट्टावर ती अडून बसली आहे. सोशल मीडियावर अतुलकर यांची छायाचित्रे पाहिल्यानंतर मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर भाळले, असे तिने सांगितले. दरम्यान, या महिलेचे आई-वडील उज्जैन येथे पोहोचले असून, ते तिची समजूत घालत आहेत.

या प्रकाराबाबत सचिन अतुलकर म्हणाले की, कार्यालयीन वेळेत मी कुणालाही भेटण्यास तयार आहे. मात्र व्यक्तिगत प्रकरणामध्ये मी इच्छेविरुद्ध कुणाला भेटणार नाही. मी सागर जिल्ह्यात एसपी असताना एका सात वर्षांच्या मुलाने स्वाक्षरीसाठी मला भेटण्याचा हट्ट केला होता, अगदी खाणे पिणे सोडण्याची धमकी दिली होती. त्याच्या आईवडिलांनी मला यासंदर्भात सांगितल्यावर मी त्या मुलाला भेटलो होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत