या गंभीर आजारामुळे ४८ तास ICU मध्ये होता सोनू निगम

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

या औषधाचाही फारसा परिणाम त्याला जाणवला नाही. असं म्हटलं जात होतं की, त्याच्या शरीरावर ज्या खूणा आहेत ती सामान्य अलर्जी नव्हती.

भारतीय संगीतातलं एक नावाजलेलं नाव म्हणजे सोनू निगम. फक्त देशातच नाही तर परदेशातही त्याच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत. गेल्या काही काळापासून सोनू बॉलिवूडमध्ये सक्रीय नसला तरी त्याच्या चाहत्यांमध्ये आणि लोकप्रियतेमध्ये फारसा फरक पडला नाही.

यादरम्यान, सोनूच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. असं म्हटलं जातं की, त्वचेच्या गंभीर अलर्जीमुळे त्याला नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्याच्या शरीरावर वाढत जाणाऱ्या खुणांमुळे त्याला ४८ तास अतीदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे.

स्पॉटबॉयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, नुकतंच सोनूने एमटीव्ही अनप्लग्डच्या आठव्या सीझनचं चित्रीकरण पूर्ण केलं. त्यानंतर लगेच त्याने बीकेसी येथे काही तरी खाल्ले. यानंतर त्याच्या शरीरावर निशाण यायला सुरुवात झाली. सुरुवातीला सोनूने ही गोष्ट फार गांभीर्याने घेतली नाही. मात्र नंतर त्वचेवर डाग वाढत जात असल्यामुळे त्याने अँटी अलर्जिक औषध घेतलं.या औषधाचाही फारसा परिणाम त्याला जाणवला नाही. असं म्हटलं जात होतं की, त्याच्या शरीरावर ज्या खूणा आहेत ती सामान्य अलर्जी नव्हती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत