या घरात भुताटकी आहे असं सांगून रियाने माझ्या मुलाला घरातून बाहेर काढलं !

महाराष्ट्र News 24

काही महिन्यांपासून सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण भारतीयांच्या चांगलंच जिव्हारी लागलं आहे. त्यातच आता या प्रकरणाला एक नवीनच वळण आलं आहे. बऱ्याच दिवसापर्यंत मौन असलेले सुशांतचे वडील प्रथमच बोलले आहेत. त्यांनी सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत.सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ आणि ४२० अंतर्गत सात पानी एफआयआर पोलिसांकडे दाखल केली आहे. यात त्यांनी रियाच्या कुटुंबीयांच्या विरोधात गंभीर केले आहेत. जेव्हापासून रिया सुशांतच्या आयुष्यात आली, तेव्हापासून त्याच्या आयुष्याला उतरती कळा लागली. रिया त्याच्या आयुष्यात येण्याअगोदर तो खूप आनंदी होता आणि त्याचं आयुष्य सुरळीत चाललं होतं, पण ती आल्यापासून त्याच्या आयुष्यात बरीच उलथापालथ झाली, असं त्यांनी म्हटलं आहे.रियाचे कुटुंबीय सुशांतच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष द्यायला लागले. तो राहतो त्या घरात भुताटकी आहे, असं सांगितलं आणि त्याला ते घर सोडायला लावलं. हाच पहिला प्रघात माझ्या मुलावर झाला आणि इथूनच याची सुरवात झाली, त्यानंतर तो विमानतळाच्या जवळील एका रिसॉर्टमध्ये आश्रय करू लागला, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, सुशांत शेती करणार आहे, हे जेव्हा रियाला समजले तेव्हा तिने त्याला धमक्या द्यायला सुरवात केली. तुझे वैद्यकीय अहवाल प्रसारमाध्यमांना देईन, अशी धमकीच तीने त्याला दिली. यामुळे सुशांत खूपच तणावात होता. त्यानंतर एकदा सुशांतने माझ्या मुलीला फोन करून सांगितले की, रिया मला कुठल्याही प्रकरणात फसवू शकते. काही दिवसांनी नेमकं सुशांतने सांगितल्याप्रमाणेच झालं. सुशांतच्या खात्यात एकुण १७ कोटी रक्कम होती, त्यातील १५ कोटी रुपयांचे विविध खात्यात हस्तांतरण केले गेले. ते नेमके कुठे गेले आहेत, याचाही पोलिसांनी तपास करावा, असं त्याच्या वडिलांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत