‘या’ जिल्ह्यात 4 जानेवारीपासून शाळा सुरू होणार !

नाशिक : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार-शिक्षणमंत्री - Marathi News  | decision to start the school will be taken by the local  administration-Education Minister | Latest maharashtra News at ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा मार्च महिन्यापासून बंद आहे. मात्र आता कोरोना संसर्ग काही प्रमाणात कमी झाला असल्याचे चित्र आहे.  याच पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येत्या 4 जानेवारीपासून नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान मुंबई आणि पुण्याच्या नियोजनाचा अभ्यास करून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. पालकमंत्री छगन भुजबळा यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

4 जानेवारीपूर्वी सर्व शिक्षकांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. लसीकरणाबाबत जिल्हा प्रशासनाचं नियोजन पूर्ण झालं आहे. जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लस उपलब्ध होईल, असा अंदाज असल्याचं पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. लस देण्यासाठी जिल्ह्यात 650 बूथ तयार करण्यात येणार आहेत. एका बूथवर दिवसाला 100 जणांना लस देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत