या लेखिकेने पद्मश्री पुरस्कार घेण्यास दिला नकार

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

प्रसिद्ध लेखिका आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बहीण गीता मेहता यांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार होता. ‘पुरस्कार देण्याची ही योग्य वेळ नसल्याने मी हा पुरस्कार घेऊ शकत नाही’ असे गीता मेहता यांनी न्यूयॉर्कहून परिपत्रक काढून जाहीर केले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने गीता मेहता यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली होती. मात्र ‘हिंदुस्थान सरकारने माझी पद्मश्री पुरस्कारासाठी निवड केली याचा मला अभिमान आहे. मात्र मी हा पुरस्कार घेऊ शकत नाही. याबद्दल मला खेद आहे. हिंदुस्थानात लोकसभा निवडणुका लवकरच होणार आहेत आणि अशावेळी पुरस्कार घेतल्यास चुकीचा संदेश जाऊ शकतो. जो माझी आणि सरकारची प्रतिमा मलीन करू शकतो. याचं मला नेहमी दु:ख राहील’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत