‘या’ सहा गोष्टी निश्चित करतील राहुल गांधींची महत्वाकांक्षा

 

नवी दिल्ली: रायगड माझा 

 

थेट पंतप्रधानपदावर दावा सांगणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील हा बदल पक्षाला बळ देणारा ठरणार आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले तर आपण पंतप्रधान होण्यास तयार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. जेव्हा केव्हा काँग्रेस सत्तेत येईल तेव्हा राहुल गांधीच पंतप्रधानपदाचा चेहरा असतील ही गोष्ट सर्वांना माहिती असली तरी त्यांनी स्वत: याबाबत कधीही भाष्य केले नव्हते. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कशी कामगिरी करतो त्यावर मी पंतप्रधान होणार की नाही हे ठरले. लोकसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर ते शक्य असल्याचे राहुल म्हणाले.

त्याच्या या विधानाचा दुसरा अर्थ असा होतो की मोदी पुढचे पंतप्रधान होणार नाहीत. पण जर खरच राहुल गांधी यांना पंतप्रधान व्हायचे असेल तर त्यासाठी कोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरणार आहेत.  राहुल गांधींच्या पंतप्रधानपदासाठीचे महत्त्वाचे ठरणारे सहा मुद्दे…

1) 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर 19 राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या 19 राज्यात लोकसभेच्या 371 जागा आहेत. 2014च्या लोकसभेत भाजपने या 371 पैकी 191 जागांवर विजय मिळवला होता. पण आता या 19 राज्यातील भाजपच्या जागा 148वर आल्या आहेत. म्हणजे भाजपच्या 43 जागा कमी झाल्या आहेत.

2) राजस्थानमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. 2014मध्ये भाजपला 58 टक्के मते मिळाली होती. पोटनिवडणुकीत केवळ 41 टक्के मते मिळाली आहेत. याउटल काँग्रेसला मिळालेले मतांची टक्केवारी 37 टक्क्यांवरून 53 टक्क्यांवर पोहोचली आहे. पोटनिवडणुकीचा विचार करता लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा 25वरून 8 होतील तर काँग्रेसच्या शून्यावरून 17 होतील.

3) याच बरोबर अन्य 20 राज्यात 396 जागा आहे जेथे भाजपला 2014मध्ये 216 जागा मिळाल्या होत्या. त्या कमी होऊन 156 होतील.

4) राहुल गांधी यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे राज्य उत्तर प्रदेश ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या गोरखपूर आणि फुलपूर येथील पोटनिवडणुकीत सप-बसप आघाडीने भाजपचा पराभव केला होता. सप-बसप आघाडी अशीच राहिली तर भाजपच्या जागा 71 वरून 21वर येतील. यावरून लोकसभेच्या सर्व जागांचा विचार केल्यास भाजपला 2014मध्ये मिळालेल्या 287 कमी होऊन त्या 177वर येतील. म्हणजेच भाजपला 110 जागांचा फटका बसू शकेल.

5) देशातील 11 राज्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत होते. 2014च्या आकड्यांचा विचार केल्यास या राज्यात 214 जागा आहेत. त्यापैकी भाजपला 163 तर काँग्रेसला 18 जागा मिळाल्या होत्या. 2017मधील गुजरात विधानसभा निवडणुकीचा आधार घेतल्यास या 214 पैकी भाजपला 151 जागा मिळीतल तर काँग्रेसला 30 जागा मिळतील. तर राजस्थान निवडणुकीचा आधार घेतल्यास 214 पैकी भाजपला 134 तर काँग्रेसला 47 जागा मिळतील.

6) लोकसभा निवडणुकीत जर काँग्रेसला 100च्या पुढे जायचे असेल तर कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत. या तिन्ही राज्यात मिळून 68 जागा आहेत. 2014मध्ये यापैकी केवळ 12 जागांवर काँग्रेसचा विजय झाला होता. प्रत्यक्षात या तिन्ही राज्यात मिळून काँग्रेसला किमान 34 जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत