युतीसाठीच्‍या भाजपच्‍या प्रयत्‍नांना उद्धव यांनी झिडकारले;  राममंदिर हा पण चुनावी जुमला म्‍हणून जाहीर करा!

महाड : सिद्धांत कारेकर 

केंद्रातील सरकार हे थापाडयांचे सरकार आहे. अच्‍छे दिन, घर देवू, नोकऱ्या देवू हे सगळे चुनावी जुमले असतील तर राममंदिर हा सुदधा चुनावी जुमला होता हे सांगून टाका म्‍हणजे तुम्‍ही 280 वरून परत 2 वर याल. भाजपाने विटा जमवल्‍या त्‍या मंदिरासाठी नव्‍हे तर सत्‍तेच्‍या सिंहासनावर चढण्‍यासाठी असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांनी केलाय.

राममंदिराची केस 3 मिनीटात उडवली. राममंदिराच्‍या मुददयावर मोदींना जाब विचारण्‍यासाठी मी आयोध्‍येला जाणार असल्‍याचं उद्धव यांनी सांगितलं. राज्‍यव्‍यापी दौऱ्यातील दुसऱ्या  टप्‍प्‍यात रायगड लोकसभा मतदार संघातील महाड येथे आयोजीत  शिवसैनिकांच्‍या मेळाव्‍यात ते बोलत होते.

यावेळी व्‍यासपीठावर केंद्रीय मंत्री अनंत गीते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार भरत गोगावले, विनोद घोसाळकर, सचिव मिलींद नार्वेकर उपस्थित होते. उद्धव यांनी आपल्‍या भाषणात मोदी सरकारबरोबरच राज्‍यातील फडणवीस सरकारला लक्ष्‍य केलं. शिवसैनिकांनो युती होईल की नाही याची चिंता तुम्‍ही करू नका, ते मी बघतो. मला फक्‍त माझा भगवा हवा, दुसऱ्या फडक्‍यांची मला गरज नाही, अशा शब्‍दात शिवसेना पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांनी भाजपकडून सुरू असलेल्‍या युतीच्‍या प्रयत्‍नांना झिडकारले आहे.

दुष्‍काळ जाहीर केला पण चारा, पाण्‍याचं नियोजन काहीच नाही. मराठवाडा विदर्भात भीषण स्थिती आहे. मुलभूत प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होत आहे अशा शब्‍दात उदधव ठाकरे यांनी राज्‍यातील फडणवीस सरकारला खडे बोल सुनावले. मदांध हत्‍तीवर अंकुश ठेवण्‍यासाठी आपण सत्‍तेत आहोत पण गाफील राहू नका.  असे आवाहन उदधव यांनी शिवसैनिकांना  केलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत