युतीसाठी भाजपापुढे पायघड्या घालणाऱ्या शिवसेनेने अखेर उमेदवारी अर्ज दाखल केले

कर्जत : भूषण प्रधान 

भाजपापुढे युतीसाठी पायघड्या घालणाऱ्या शिवसेनेने आज कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपले स्वतंत्र उमेदवारी आज दाखल केले. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

येत्या 27 जानेवारीला कर्जत नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती व्हावी यासाठी शिवसेनेच्या काही नेत्यांनी कालपर्यंत प्रयत्न केले. मात्र एक जागेवरून मतभेत निर्माण झाल्याने शिवसेनेने आज शेवटी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी सुवर्णा जोशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेनी कर्जत शहरातून रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता दळवी, उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांच्यासह तालुक्यातील आणि शहरातील पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा जोशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी आपण या निवडणुकीत नक्कीच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय.

कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने आरपीआय सोबत युती अगोदरच केली होती. मात्र शिवसेनेसोबत भाजपाने देखील आपल्यासोबत युती करून ही निवडणूक लढवावी या प्रयत्नांत शिवसेनेचे  पदाधिकारी होते.यासाठी वरिष्ठ स्तरावरून चर्चा देखील सुरू होत्या. मात्र भाजपने या आगोदरच स्वबळाचा नारा दिल्यानंतर पुन्हा शिवसेनेशी युती करायची या निर्णयापर्यंत भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी तयार होत नव्हते. अखेर आज शेवटी शिवसेना आणि आरपीआयने आपले उमेदवारी अर्ज दाखल करून एकला चलो रे चा नारा दिलाय. मात्र हा नारा कायम राहतो का आणखी काही समीकरणे जुळतात याकडे आता मतदारांचे लक्ष लागले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत