युनियन बँकेच्या गलथान कारभाराविरोधात माथेरान व्यापारी वेल्फेअर असोसिएशनने दिला उपोषणाचा इशारा

माथेरान : दिनेश सुतार 

जगप्रसिध्द पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये एकमेव नामांकित राष्ट्रीयकृत बँक युनियन बँक ऑफ इंडिया आहे. परंतु सदर बँकेच्या गलथान कारभारामुळे माथेरानमधील सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बँकेमध्ये असलेला अपुरा कर्मचारी वर्ग, बँकेचे सर्वर वारंवार बंद होणे, ए.टी.एम वारंवार बंद राहणे, ग्राहकांचे पासबुक अपडेट न होणे यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. नागरिकांना तासनतास बँकेच्या कामासाठी ताटकळत उभे रहावे लागते. त्यात ही अपुऱ्या जागेमध्ये कामकाज सुरु असल्याने ग्राहकांनाची गैरसोय होत आहे. मात्र अनेकदा तक्रार करून देखील अद्याप बँक प्रशासनाकडून बँकेच्या सुरळीत कामकाजाबद्दल समाधानकारक उत्तर मिळत नाही. अनेकदा वेळेवर सुविधा मिळत नसल्याकारणाने माथेरान मधील फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे देखील हाल होतात. मात्र येथील नागरिकांना तसेच पर्यटकांना भेडसावणाऱ्या समस्येकडे बँक प्रशासन नेहमीच कानाडोळा करताना दिसून येत आहे. यामुळेच आता माथेरान व्यापारी असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतली आहे.

सोमवार दि. २५/१०/२०२१ पर्यंत बँकेच्या सर्व कारभार सुरळित पणे पूर्वपदावर न झाल्यास मंगळवार दि. २६ / १० / २०२१ रोजी युनियन बँक ऑफ इंडिया माथेरान शाखेच्या गलथान कारभाराविरोधात माथेरानमधील राम मंदिर चौक येथे उपोषण करण्यात येईल. तसेच होणाऱ्या परिणाम व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यांची संपूर्ण जबाबदारी युनियन बँक ऑफ इंडिया माथेरान शाखेची राहील, असं युनियन बँकेला दिलेल्या निवेदन पत्रात म्हटलं आहे. यावेळी माथेरान माथेरान व्यापारी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश चौधरी, नगरसेवक चांद्रकांत चौधरी, प्रतीक ठक्कर, निसार महापुळे उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत