युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मुंबईतील ब्रिटिशकालीन इमारती

 

रायगड माझा  वृत्त

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मुंबईतील ब्रिटिशकालीन इमारतींना स्थान मिळाले असून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंतच्या अनेक इमारती ब्रिटीशकालीन आहेत. आजही या इमारती आपला दिमाख कायम राखत डौलदारपणे उभ्या आहेत आणि मुंबईच्या सौंदर्यात भर घालत आहेत. आता युनेक्सोकाच्या जागतिक वारसा यादीत याच इमारतींपैकी काही इमारतींना स्थान मिळाले आहे. ही मुंबईसाठी नक्कीच गौरवास्पद बाब ठरली आहे. यात १९ व्या शतकातील व्हिक्टोरियन संरचना आणि २० व्या शतकातील आर्ट डेको इमारतींचा समावेश आहे. ही घोषणा शनिवारी बहरिन येथे झालेल्या युनेस्को जागतिक वारसा समितीच्या बैठकीत करण्यात आली. फोर्ट प्रेसिंक्ट आणि मरीन ड्राईव्ह प्रेसिंक्ट या दोहोंमध्ये हेरिटेज परवाना विभागलेला आहे.

या संदर्भातील वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या यादीत मुंबई विद्यापीठ इमारत, जुने सचिवालय, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, डेव्हिड ससून ग्रंथालय. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, पश्चिम रेल्वे मुख्यालय आणि आर्ट डेकोच्या सार्वजनिक इमारतींचा समावेश आहे. बॅकबे आगारातील स्कीमची पहिली ओळ, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया राम महाल यांनी दिनशॉ वाचा रोड, इरॉस व रीगलचे सिनेमागृह आणि मरीन ड्राईव्हवरील इमारतींच्या पहिल्या ओळी यासारख्या इमारती आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत