युवकाच्या अपहरण प्रकरणी तिघांना अटक

नाशिक : रायगड माझा वृत्त

सुरगाणा तालुक्यातील गोंदुणे येथील युवकाच्या अपहरण प्रकरणातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

 The kidnapping of the young man gets arrested | युवकाच्या अपहरण प्रकरणी तिघांना अटक
तालुक्यातील गोंदुणे येथील युवक प्रकाश गावित याचे अठ्ठावीस आॅगस्ट रोजी दोन लाख खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. यापैकी साठ हजार रु पये प्रकाशचा भाऊ दिनेशने रात्रीच पेट्रोल पंपाजवळ आणुन दिले होते. त्यानंतर युवकाने अपहरणकर्त्याच्या तावडीतून पळ काढून सुटका करून घेतली होती. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस राजकीय दबावाला बळी पडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते असा आरोप केला जात होता. पोलिसांनी तात्काळ तपास करु न संशयित आरोपी माँन्टी उर्फ केशव तानाजी महाले (१८ रा. करंजाळी), डाऊ उर्फ गिरिश भिका पवार (१८, रा. देविपाडा) तर एक बालकासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना दिंडोरी येथील न्यायालयात हजर केले असता दोघांना दहा तारखेपर्यत चौकशी करीता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर बालकाला बालसुधार गृहात पाठविण्यात आले आहे. तत्काळ कारवाई केल्याबाबत नागरिकांनी पोलिसांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे. याबाबत पोलीस निरीक्षक सुनील खरे, सहायक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र दिवे, सुभाष माने तपास करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत