युवक कॉंग्रेसकडून वनमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

नागपूर : रायगड माझा वृत्त 

भारतीय वन्यजीव अधिनियमाचे उल्लंघन करीत रात्रीच्या वेळी टी-वन वाघिणीची (अवनी) शिकार केल्याच्या आज युवक कॉंग्रेसतर्फे “टायगर कॅपिटल’ म्हणून फलक लावलेल्या सिव्हील लाईन्स परिसरात आंदोलन करुन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

अमिताभ बच्चन यांनी व्याघ्रदूत म्हणून माघार घ्यावी 
टी 1 वाघिणीला (अवनी) वन विभागान ठार मारल्याने महानायक अमिताभ बच्चन यांनी व्याघ्रदूत म्हणून माघार घ्यावी अशी मागणी वन्यजीव प्रेमी आणि पिपल्स फॉर ऑनिमनलच्या पदाधिकारी करिश्‍मा गिलानी यांनी आज केली. वाघांच्या संवर्धनासाठी अमिताभ बच्चन यांनी व्याघ्रदूताची जबाबदारी स्विकारली आहे. त्याला वनविभागाकडूनच तिलांजली दिली जात असल्याने व्याघ्रदूत म्हणून माघार घ्यावी अशीही मागणी केली आहे

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत