युवतीच्या प्रश्नाने महापालिकेला दणका

नगर: रायगड माझा वृत्त 

माउली सभागृहात झालेल्या ठाकरेंच्या ‘युवा संवाद’ उपक्रमात राधाबाई काळे महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रद्धा तापकीर हिने महाविद्यालयाबाहेरील कचरा व त्याची दुर्गंधी, रस्त्याचे अर्धवट पडलेले काम, हॉटेल वेस्ट टाकले जात असल्याने होणारा मोकाट कुत्र्यांचा त्रास या समस्या मांडल्या. त्यावर ठाकरेंनी संवाद कार्यक्रमानंतर लगेच काळे महाविद्यालयात मंत्री कदमांसमवेत येत असल्याचे जाहीर केले. ते ऐकल्यानंतर बाहेर यंत्रणा हलू लागली.

त्याआधी मंत्री कदम तेथे पोहोचले होते व त्यांनी भालसिंग यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घेऊन विविध सूचना केल्या. नंतर ठाकरेंनीही येऊन घाण पाण्याने भरलेला नाला, त्याभोवती वाढलेली झाडी, परिसरात पडलेले कचऱ्याचे ढीग पाहून नाराजी व्यक्त केली.  ठाकरे व कदम यांनी नंतर तेथे भेटही देऊन महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना काही सूचना केल्या व त्यानंतर अवघ्या २० मिनिटांत महाविद्यालयाजवळ ‘जेसीबी’ दाखल होऊन येथील नाला सफाईचे कामही सुरू झाले.

महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला कळवले गेले. ठाकरेंसमवेत मंत्री कदम व त्यांचा ताफाही येणार असल्याने महापालिका आयुक्त भालसिंग व घनकचरा व्यवस्थापन प्रमुख राजेंद्र मेहेत्रे तातडीने महाविद्यालयावर पोहोचले. इकडे ठाकरेंनी ‘युवा संवाद’ कार्यक्रमानंतर आपल्या जनआशीर्वाद यात्रेच्या बसमध्ये काळे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना बसवून महाविद्यालयाकडे कूच केले.  त्यांनीही धाडसीपणे अर्धवट रस्ता, नाल्याची व कचऱ्याची दुर्गंधी, मोकाट कुत्र्यांचा त्रास, स्वच्छतेचा असलेला अभाव असे मुद्दे मांडले. या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तातडीने आवश्यक कार्यवाहीची ग्वाही भालसिंग यांनी दिली; मात्र, युवतीने एका प्रश्नाने हलवलेली यंत्रणा नंतर उपस्थितांच्या चर्चेत केंद्रस्थानी राहिली.

समवेत असलेल्या महाविद्यालयांच्या मुलींनाही बोलते करून त्यांच्या अडचणी आयुक्तांसमोर मांडण्याचे सुचवले. युवा सेना प्रमुखांच्या ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमात युवतीने महाविद्यालयाजवळ झालेली कचरा कुंडी व हॉटेल वेस्टेजमुळे मोकाट कुत्र्यांच्या त्रासाची तक्रार मांडली…आणि पोलिस, महसूल व महापालिका यंत्रणा कामाला लागली. आदित्य ठाकरेंनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासमवेत लगेच महाविद्यालयाला भेट देऊन संबंधित समस्या पाहण्याचे जाहीर केल्यावर यंत्रणेची धावपळ सुरू झाली. आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने मांडलेल्या एका प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी थेट आदित्य ठाकरेच महाविद्यालयात आल्याचे पाहून येथील विद्यार्थिनींनी जल्लोष केला. आदित्य ठाकरेंसमवेत सेल्फी घेण्यासाठी त्यांची लगबग सुरू होती. यानिमित्ताने ठाकरेंनीही त्यांच्याशी संवाद साधून, समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारण्याचे धाडस अंगी बाणवण्याचे आवाहन केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत