युवासैनिकांनो कोणी समोरून आ रे केलं तर आपल्याकडून का रे झालेचे पाहिजे; युवासेना सचिव वरूण सरदेसाई

खालापूर : समाधान दिसले

युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी खालापूरात उत्तर रायगडमधील पदाधिकाऱ्याशी साधला संवाद

आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणूकीच्या पाश्वभूमीवर युवासेना कामाला लागल्याने युवासेनाप्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे याच्या आदेशाने युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी संपूर्ण महाराष्ट्रात युवासैनिक पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेत त्याच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याने वरुण सरदेसाई यांनी 23 जून रोजी उत्तर रायगड जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी वर्गाशी खालापूर येथील चौकमध्ये संवाद साधल्या सर्व उपस्थित युवासेना पदाधिकारी वर्गानी तळागाळात काम करताना भेडवणाऱ्या समस्या मांडून आपल्या व्यथा व्यक्त करताच त्यांना सरदेसाई यांनी कानमंत्र दिल्याने युवासैनिक पदाधिकारी वर्गात उत्साह संचारला होता.

याप्रसंगी रायगड जिल्हा विस्तारक ओमकार चव्हाण यांनी उत्तर रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी वर्गासह युवासैनिकांचे आभार मानत कोरोना काळातील त्याच्या कार्याचे कौतुक करित विधानसभा निवडणूकीत युवासैनिकांनी मोलाची भूमिका बजावल्याचे निदर्शनास आणून देत पुढील काळात असे काम करत रहा असा संदेश उपस्थितीतांना दिला. तर युवासेना खालापूर तालुका महेश पाटील यांनी खालापूर तालुक्याचा सर्व भौगोलिक आढावा मांडत परखडपणे बोलताना म्हणाले की, खालापूरच्या औद्योगिक नगरीत भुमिपुत्रांना नोकरीसाठी वणवण करावे लागते यांची खंत आहे. जर येत्या काळात भुमिपुत्रांना कारखानदारांनी योग्य तो न्याय न दिल्यास युवासेना कारखानदारीवर धडक देईल असे मत मांडल्याने युवासैनिकांनी टाळ्याचा कडकडात करित आपल्या भावना सचिव सरदेसाई साहेबांन पर्यत पोहचवल्याने खालापूरातील भुमिपुत्रांनी तालुका अधिकारी पाटील यांचे आभार मानले.

तसेच पनवेल विधानसभा अधिकारी पराग मोहिते यांनी मनोगतातून मत व्यक्त करताना पनवेल तालुक्यातील युवासेनेची असलेली बांधणी आणि युवासेनेच्या कार्यप्रणालीचा आढावा सादर येत्या काळात होणाऱ्या निवडणूकीत शिवसेनेची सत्ता स्थापन करण्यासाठी युवासेना ताकदनिशी उतरेल असे आश्वासन दिले तर कर्जत तालुका अधिकारी अमर मिसाळ यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, कर्जत तालुक्यात गाव तिथे युवासेना शाखा असल्याने या माध्यमातून तालुक्यात 80 टक्के ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व असून शिवसेनेच्या ताकदीवर मला पंचायत समितीचे सभापतीपद भूषविण्यास मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.

युवासेना पदाधिकारी वर्गाशी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी संवाद साधताना सर्वप्रथम सर्वाचे कौतुक करीत महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता बसविण्याची आपली सर्वाची असलेली साथ लाख मोलाची असून युवासेना आहे, म्हणून वरुण सरदेसाई सचिव आहे. त्यामुळे सर्वाना प्रथम आपला पाया मजबूत करून पक्ष संघटनाबरोबर सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपआपले वर्चस्व स्थापित करा. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आधी लोकांपर्यत पोहचून त्याच्या समस्या मार्गी लावल्यास त्यातून समाजहिताचे कार्य घडून पक्ष संघटन मजबूत होण्यास चालना मिळेल. जर आपल्या पक्षात अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यां येण्यास इच्छुक असेल त्यास आपल्या पक्षात सामील करीत जुने राजकीय वादविवाद विसरून जा. तसेच कोणी विरोधक आ रे करत असेल तुम्ही का रे केलेचं पाहिजे तेव्हा युवासेना – शिवसेनेची ताकद समोरच्याला दिसेल. समोरच्या घाबरून न जाता आपल्या स्पर्धकांवर तुटून पडा त्यातून जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तर इतिहास होईल अशा अनेक विषयावर सचिव सरदेसाई यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद त्याच्या समस्या जाणून घेतल्या.

याप्रसंगी युवासेना सचिव वरुण सरदेसाई, सहसचिव योगेश निमसे, रायगड जिल्हा विस्तारक ओमकार चव्हाण, जिल्हा अधिकारी मयुर जोशी, उपजिल्हाधिकारी अविचत राऊत, नितीन पाटील, जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, विधानसभा अधिकारी संदीप बडेकर, अँड.नितेश पाटील, पराग मोहिते, समन्वयक प्रथमेश मोरे, तालुका अधिकारी महेश पाटील, अमर मिसाळ, उपतालुका अधिकारी प्रसाद थोरवे, रूपेश चोगले, नितीन तवले, प्रसाद देशमुख, नगरसेवक अँड.संकेत भासे, महिला नेत्या रामिया पिल्ले, वृषाली तांदले, गिरीश जोशी, रोशन पाटील, धनजंय राणे, मयुर मांडे, तेजस पाटील, महेश पांचाळ, गणेश मोरे, प्रितेश मोरे, वैभव मोहीते, प्रणव लबडे आदीप्रमुख उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत