यूपी-बिहार, उत्तराखंडात विषारी दारूने 40 जणांचा बळी

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

Related image

विषारी दारूने पुन्हा उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंड या तीन राज्यात थैमान घातले आहे. विषारी दारू पिऊन तीन राज्यांत वेगवेगळ्या ठिकाणी आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दारूकांडातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून बिहार आणि उत्तराखंड सरकारची देखील झोप उडाली आहे.

विषारी दारूने मृत्यू होण्याची सुरुवात उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर जिल्ह्यातील देवबंदमधून झाली. देवबंद येथे विषारी दारूने 5 जणांचा बळी घेतला तर, तर संपूर्ण  जिल्ह्याती आतापर्यंत एकुण 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अवेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर कुशीनगरमध्ये विषारी दारू प्यायल्याने दोन दिवसांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या दारुकांडामुळे एका अबकारी अधिकाऱ्यासह 4 पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. दुसरीकडे उत्तराखंडात देखील विषारी दारू प्यायल्याने दोन दिवसांत 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत