येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

बंगळुरू : रायगड माझा

कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ जमवता आले नाही त्यामुळे त्यांनी बहुमत सिद्ध करण्याअगोदरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी आम्हाला जनतेने दिलेला कौल मान्य असल्याचे सांगत शेवटच्या श्वासापर्यंत आपण जनतेची सेवा करू असे म्हटले आहे.

विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर येडियुरप्पांकडून विधानसभेत बहुमताचा प्रस्ताव सादर करत आपल्या भाषणाला सुरुवात केली. आज माझी अग्निपरीक्षा आहे असे म्हणत येडीयुरप्पा यांनी  सरकारच्या विरोधात असणारा आक्रोश जनतेने व्यक्त केला आहे असे सांगतिले. तसेच आम्हाला मिळालेली जबाबदारी आम्ही योग्य पद्धतीने पार पाडली आहे. जनतेचा कौल भाजपच्या बाजूने असून सिद्धरामय्या सरकारने जनतेचे कोणतेही काम केले नाही लोकांनी दिलेले प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही असे म्हणत येडीयुरप्पा भावून झाले. तसेच  आम्हाला सर्वात मोठा पक्ष केल्याबद्दल जनतेचे आभार शेवटच्या श्वासापर्यंत मी जनतेची सेवा करत राहीन, मी पुन्हा एकदा जिंकून दाखवेन, सक्षम राज्य बनवून दाखवेन: मी सर्व जनतेचे हात जोडून आभार मानतो असे त्यांनी आपल्या भाषणात दरम्यान म्हटले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत