येणाऱ्या बाळाच्या नागरिकत्वावर सानिया मिर्झाने केला हा मोठा खुलासा

 

रायगड माझा वृत्त 

नवी दिल्ली : भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा सध्याच्या घडीला गर्भवती असून सानियाला महिन्याभरात बाळ होणार आहे. त्यामुळे याबद्दल लोकांच्या मनात बरेच प्रश्न आणि कुतुहलदेखील आहे. सानिया भारताची, तर तिचा पती शोएब मलिक हा पाकिस्तानचा असल्यामुळे कोणत्या देशाचे नागरिकत्त्व तिच्या बाळाला मिळू शकते, सध्या यावर जोरदार चर्चा सुरु असून सानियाने या प्रश्नाचे उत्तरही दिले आहे.

सध्या आठ महिन्यांची सानिया गर्भवती असून तिने काही दिवसांपूर्वी एक फोटोशूट केले होते. त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. आता तिच्या या बाळाबद्दल बरेच प्रश्न विचारले जात आहे आणि सानियानेही या प्रश्नांना उत्तर दिले आहे. तिचे बाळ कोणत्या देशाचा नागरिक असेल, असे विचारल्यावर सानिया म्हणाली की, कोणत्या देशाचे नागरिकत्व माझ्या बाळाला द्यायचे, याचा विचार आम्ही आत्ता केलेला नाही. पण मी आणि शोएब याविषयावर काही दिवसांत निर्णय घेऊ. कदाचित माझ्या बाळाला भारत किंवा पाकिस्तान यापेक्षा तिसऱ्या देशाचेही नागरिकत्त्व मिळू शकते.

माझे बाळ क्रिकेटपटू होणार की टेनिसपटू, यावरही बरेच प्रश्न विचारले जात आहेत. मला वाटते हे ठरवण्यासाठी अजून बराच कालावधी आहे. माझ बाळ कदाचित खेळाडूदेखील होणार नाही. पण मला असे वाटते की माझ्या बाळाने डॉक्टर व्हावे आणि लोकांची सेवा करावी, असे सानिया म्हणाली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत