ये बाप्पा बल्लाळेश्वरा या प्रशासनाला सद्बुध्दी दे ! आणि एकदाची पाली नगरपंचायत होऊ दे !

आम्हां पालीकारांची काय अवस्था झाली आहे यांची काय कोणाला पडली आहे कां ? नळाला पाणी नाही, तुंबलेले कचऱ्याचे ढीग, रस्त्यावर मोठमोठे खड्डे, वाहतूक कोंडी या समस्या सोडवणार कोण !

निवडणुकीवर बहिष्कार, बहिष्कार हे नक्की चाललंय काय ? मागे काय झालं कुणी काय केलं हे आता थांबवा !

पाली : विनोद भोईर

गेली पाच वर्षापासून पाली ग्रामपंचायत की नगरपंचायत हे घोंगड भिजतच पडलं आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने २६ जून २०१५ रोजी अधिसूचना काढून पाली ग्रामपंचायतीसह रायगड जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचे अध्यादेश काढले. मात्र या अधिसूचने विरोधात पाली ग्रामपंचायतीचे तत्काळीन सरपंच व सदस्य यांनी न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली व त्याचा निकाल त्यांचे बाजूने लागून पुन्हा पाली ग्रामपंचायत करण्यात ही लोक यशस्वी झाली. त्यानंतर पुलाखालून खूप पाणी गेल मात्र कोणत्याही पक्षाच्या पुढांऱ्यानी नगरपंचायत व्हावी यासाठी पुढाकार घेऊन तत्परतेने कागदपत्री पूर्तता केल्याचे दिसूनही आले नाही.

बघता बघता अखेर त्यावेळच्या सभासदांचा कार्यकाल ही संपला. आणि मे २०१८ ला पाली ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली व जनतेतून थेट निवडून येणाऱ्या सरपंचपदाच आरक्षण अनुसूचित जमातीच पडल यामुळे गुढग्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचा भ्रम निरास झाला तरी देखील सर्व राजकीय पुढारी निवडणुकीच्या तयारीला लागले सरपंचपदासाठी ४ उमेदवारी आर्ज दाखल झाले तर सदस्य पदासाठी तब्बल ५४ उमेदवार रिंगणात उभे होते. मात्र कोणास ठाऊक काय माशी कुठे शिंकली ? आणि अचानकपणे सर्व पक्षीय नेते मंडळीं एकवटली आपल्याला ग्रामपंचायत नको नगरपंचायत झाली पाहिजे म्हणून बैठका घेतल्या सर्वांची मनधरणी करून आपल्याला समस्त पालीकरांच्या हितासाठी व पाली नगरीच्या शासवत विकासासाठीच पाली नगरपंचायत होण काळाची गरज आहे अस सागून अगदी अपक्ष उमेदवारांना देखील नामनिर्देशनपत्र मागे घेण्यास भागपाडले. म्हणजे हे कस झालं ‘ सौ चुवे खाके बिल्ली चली हज ‘ असं बोलल तर वावग ठरणार नाही. बिचाऱ्या त्या अपक्षांचा बली देऊन शेवटी ग्रा.प निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात सर्व पक्षीय नेते यशस्वी झाले.

ठरले प्रमाणे पाली नगरपंचायत व्हावी यासाठी एक कमिटी स्थापन केली. व त्या कमिटीने पुढील सर्वप्रक्रिया करण्याचे ठरल पण कोणाला पडलंय पालीकारांचे सुखं आणि दुःखाच बोलतात ना ‘ डाळभात लोनचा आणि कोण नाय कोणचा ’ आसच झाल. तीन महिने उलटून गेले सुधागडातील शेवटच्या टप्प्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला त्यात पाली ग्रामपंचायतीचा देखील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. मग ‘ पुन्हा येरे माझ्या मागल्या ‘ ५ ते ११ सप्टेंबर नामनिर्देशनपत्र दाखल करणे २६ सप्टेंबर ला मतदान जाहीर झाल्यावर पुन्हा सर्व पक्षीय नेत्यांना जाग आली. आता करायचं काय गुप्त बैठका होऊ लागल्या त्यामध्ये काय जमल नाही पुन्हा सर्व पक्षीय मंडळीं एकत्र आली.

निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ठरला त्याप्रमाणे शनिवार (८) सप्टेंबरला सर्व पक्षांचे प्रमुखनेते मंडळी पाली तहसील कार्यालयावर धडकली दुसऱ्यादां पाली ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे पत्र तहसीलदार बी.एन.निंबाळकर यांना दिले. मात्र त्याचं दिवशी या नेते मंडळीना फाट्यावर मारत प्रभाग क्रमांक ५ व २ मधून काही अपक्ष उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. मग आता आशी बोलण्याची वेळ आली आहे की ज्यांनी आगोदर आलेली नगरपंचायत घालविली त्यांच्याच पाऊलावर पाउल ठेवून पुन्हा अपक्ष उमेदवार चाललेतर नाहीत ना ? आताचे पाली शहाराचे वाढते नागरीकरण पाहता पाली ग्रामपंचायत या शहराला पाहिजे तश्या नागरी सोयीसुविधा पुरविण्यात पुरती अपयशी ठरत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. मात्र पाली नगरपंचायत झाल्यास नगरविकास खात्याकडून मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकतोय.

यातच पाली येथे अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी बल्लाळेश्वराचे प्रसिद्ध मंदिर असल्याने येथील आजूबाजूच्या परिसरातील नागरीकरण झपाट्याने वाढताना दिसत आहे. परंतु ग्रामपंचायत असल्यामुळे पाली शहरात होत असलेले अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, यावर ग्रामविकास विभागाचा अंकुशच राहिला. सरपंचासह पुढारी ग्रामसेवकाला आगदी खिचातच घेऊन फिरत असल्यासारखे झाले आहे. मात्र यावर अंकुश ठेवायचा असेल तर नगरपंचायत होण ही काळाची गरज आहे. नगरपंचायत झाल्यास सी.ओच्या दर्ज्याचा अधिकारी तेथील कामकाज पाहतो कोणाची मनमानी चालून देत नाहीत. सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच सर्व कारभार केला जातो.

कोणतीही अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, सरकारी जागेवरील अतिक्रमणे हटविणे सहजपणे शक्य होइल. मात्र यासाठी पाली नगरपंचायत होण ही काळाची गरज आहे. आस झाल नाही तर मग तेच गढूळ पाणी, तीच वाहतूककोंडी, जागोजागी तुंबलेले कचऱ्याचे ढीग अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे या सर्व समस्यांना सर्वसामान्य नागरिकांना तोंड द्यावेच लागणार. म्हणून म्हणतो ‘ उठा पालीकरानो जागे व्हा ’ नगरपंचायतीचा धागा व्हा ! आता नाही तर पुन्हा कधीच नाही

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत