योग साधना मानवी जीवनात महत्वाचे : केंद्रियमंत्री अनंत गीते

रोहे : महादेव सरसंबे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतॄत्वाखाली गेली 4 वर्ष देशभर योगदिन साजरा करण्यात येतो. आज ही देशातील मंत्री मंडळातील माझे सहकारी, खासदार यांच्यासह योग दीन देशाच्या कानाकोपऱ्यात  साजरा करण्यात येत आहे. योग हे भारतीय संपत्ती आहे, ही संपत्ती जतन करण्याचे काम आपणास कारावयाचे आहे. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी योग महत्वाचे आहे. या योग साधनेला जाहीर स्वरूप पंतजली ऋुषी यांनी दिली. योग ही भारतीय संपत्ती असून त्याचा जागतीक योग दिनाच्या निमित्ताने विश्वगौरव करण्यात आले आहे. त्यामुळे योग समजणे व अवगत करणे आवश्यक असुन योग साधना मानवी जीवनात महत्वाचे असल्याचे केंद्रिय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केले. 

21 जुन जागतीक योग दिनाचे औचित्य साधुन या योग दिना निमित्त आयुष मंत्रालय भारत सरकार उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या वतीने रोहा तालुक्यातील जे.एम.राठी इंग्लीश स्कुलच्या मैदानावर सकाळी 8 वाजता आयोजित योग शिबीरात उपस्थितांना मार्गदर्शन केंद्रिय मंत्री अनंत गीते बोलत होते.

यावेळी व्यासपिठावर रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकश देसार्इ, भाजप नेते व समन्वय समिती अध्यक्ष संजय कोनकर, जिल्हा सल्लागार किशोर जैन, रोहा तालुका प्रमुख समिर शेडगे, जिंदल कंपनीचे वरीष्ठ अधिकारी शिवकुमार, सुदर्शन कंपनीचे बी.एन.कदम, प्रशांत मिसाळ, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमित घाग, मुख्याध्यापीका लिना डेवीड, उपमुख्याध्यापक दिपक माने, भाजप विधी सेल अध्यक्ष दिपक पडवळ, शिवसेना कामगार सेल अध्यक्ष  हर्षद साळवी, विभाग प्रमुख नितीन वारंगे, संतोष खेरटकर, शिवसेना महीला नगरसेविक समिक्षा बामणे महीला आघाडी संघटक निता हजारे,यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत