रजनीकांत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

चेन्नई : रायगड माझा वृत्त

रजनी मक्कल मंदरम हा आपला पक्ष आगामी लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, असे या पक्षाची स्थापना करणारे अभिनेते राजकीय नेते रजनीकांत यांनी आज जाहीर केले आहे. त्यांनी डिसेंबर 2017 मध्ये राजकारणात प्रवेश करून विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याची घोषणा केली होती.

रजनीकांत यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला असला तरी ते भाजपच्या जवळचे असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. निवडणूक प्रचारादरम्यान आपल्या पक्षाच्या चिन्हाचा, आपल्या फोटोचा तसेच रजनी फॅन क्लबचा कोणीही वापर करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. तामीळनाडूत मुख्य समस्या पाण्याची आहे. केंद्रात ज्या पक्षाचे स्थिर सरकार सत्तेवर येईल त्या पक्षाने पाणी समस्या दूर करावी. लोकांनी त्यांना मतदान करावे, असे आवाहन रजनीकांत यांनी केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत