रत्नागिरीच्या आरेवारे समुद्रात बुडून मुंबईच्या ५ जणांचा मृत्यू

रत्नागिरी : रायगड माझा वृत्त 

रत्नागिरीतील आरेवारे समुद्र किनाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या पाच पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला, तर दोघांना वाचवण्यात यश आले. किनाऱ्यावर बचाव पथक, रत्नागिरी ग्रामीण पोलीस पथक आणि ग्रामस्थांनी अथक प्रयत्नानंतर हे मृतदेह शोधले. हे सर्व पर्यटक मुंबईतील बोरिवली येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिम येथील होली क्रॉस रोडवर असणाऱ्या कॉलनीमध्ये राहणारे डिसोझा कुटुंब पर्यटनासाठी गणपती पुळे येथे जाण्यासाठी निघालेले होते. परंतु त्याआधी त्यांनी रत्नागिरीतील आरेवारे समुद्र किनाऱ्यावर पोहण्याचा आनंद घेण्याचे ठरवले. सर्व पर्यटक पोहोण्यासाठी समुद्रात उतरत असताना स्थानिकांनी त्यांना असे करण्यापासून मज्जाव केला. ज्या भागत हे कुटुंब पोहोण्यासाठी उतरत होते तेथे पाणी अधिक खोल होते. परंतु पर्यटकांनी स्थानिकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला आणि जीव गमावला. पाण्यात उतरताच खोलीचा अंदाज न आल्याने पाचही जण बुडाले, तर दोन जणांना वाचवण्यात यश आले.

> मृतांची नावं –

१) केनेथ टिमोथी मास्टर्स ( वय -५६)
२) मोनिका बेंटो डिसोझा (वय – ४४)
३) सनोमी बेंटो डिसोझा (वय – २२)
४) रेंचर बेंटो डिसोझा (वय -१९)
५) मॅथ्यू बेंटो डिसोझा (वय -१८)

> वाचवण्यात आलेल्यांची नावं –

१) रिटा डिसोझा (वय -७०)

२) लिना केनेथ मास्टर्स (वय – ५२)

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत