रत्नागिरीत अल्पवयीन मुलीवर 9 जणांचा सामूहिक बलात्कार

रत्नागिरी : रायगड माझा ऑनलाईन 

रत्नागिरीत अल्पवयीन मुलीवर 9 जणांचा सामूहिक बलात्कार

जिल्ह्यातील खंडाळा गावात एका अल्पवयीन मुलीवर 9 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. 9 जणांच्या या टोळक्याने गावातील या पीडित गरीब मुलीवर अत्याचार केले . या प्रकरणी आतापर्यंत एका नराधमाला बेड्या ठोकल्या आहे.

खंडाळा गावात राहणारी पीडित अल्पवयीन मुलीची घरची परिस्थितीत हालाखीची आहे. याचा फायदा घेऊन 9 नराधमांनी या मुलीवर अत्याचार केले. या 9 जणांच्या टोळक्यात राजकीय पदाधिकारी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून एका तरुणाला अटक करण्यात आली. पोलिसांनी पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून एका आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. वैद्यकीय तपासणीनंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहे.

दरम्यान, घडलेल्या घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार आरोपींचा शोध घेत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत