रत्नागिरी, रायगडमध्ये मुसळधार, सावित्री नदीनं धोक्याची पातळी गाठली

रायगड : रायगड माझा 

रायगड जिल्ह्यात महाड पोलादपूर तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. काळ, सावित्री नदी धोक्याची पातळी गाठली असून महाड शहराजवळील गांधारीफ नदीवरील पूल पाण्याखाली महाड रायगड रोड पण पाण्याखाली गेला आहे. महाड बाजारपेठ, भाजी मंडई, दस्तुरी भागात पाणी भरण्याची शक्यता आहे.बिरवाडी मच्छिमार्केटमध्ये पाणी शिरलं आहे. नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व संबंधित विभाग प्रमुखांना दक्षता घेण्यास सूचित केले आहे.

रायगडमध्ये महाड तालुक्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय.  काळनदी तुडुंब भरून वाहतेय. जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीतील वाढ चांगली आहे. जिल्ह्यात लघुपाटबंधारे विभागाची २८ धरणे आहेत. यातील ९ धरणे आत्ताच पूर्ण क्षमतेनी भरली आहेत. तर इतर आठ धरणातही ७० टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला आहे, ही एक समाधानाची बाब आहे.  फणसाड, सुतारवाडी,कवळे, उन्हेरे, पाभरे,संदेरी, खिंडवाडी, खैरे आणि भिलवले अशी पूण क्षमतेने भरलेल्या धरणांची नावे आहेत. तर वावा,कोंडगाव, कुडकी, वरंध,कोथुर्डे, कलोते मोकाशी,मोरबे, उसरण या धरणांमध्येही क्षमतेच्या ७० टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला आहे.

पालघर जिल्ह्यात गेल्या 2 तासापासून मुसळदार पाऊस सुरू आहे डहाणू ,तलासरी,विक्रमगड,जव्हार, वाडा तसेच मोखाडा तालुक्यात पावसाचा जोर सुरूच आहे तर डहाणू तालुक्यातील कासा परिसरात सखल भागात पाणी साचले आहे तर सुर्या  नदी व नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत