रविवारी माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक, कर्जत खोपोली दरम्यान अपग्रेड ब्लॉक

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Image result for mega block

रविवार 24 फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक जाहीर केला आहे. सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 वाजेपर्यंत माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजे पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेल्या गाड्या गंतव्य ठिकाणी 10 मिनिटे उशिरा पोहोचतील असेही मध्य रेल्वेने नमूद केले आहे.

सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कर्जत आणि खोपोली दरम्यान इन्फ़्रास्टक्चर अपग्रेड ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मध्य रेल्वेकडून काही लोकल रद्दही करण्यात आल्या आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत