रवींद्र मराठे अटक; पुणे पोलीस गोत्यात

पुणे: रायगड माझा 

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य पद्धतीनं कर्ज दिल्याच्या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या आजी-माजी अध्यक्षांना अटक करणारे पोलीसच आता गोत्यात आले आहेत. अटक करताना पोलिसांनी स्वत: नियम पायदळी तुडवल्याचं समोर आलं आहे.

पुणे पोलिसांनी स्वत:च्या अधिकारात येत असलेल्या ‘एमपीआयडी’ कलमाखाली बँकेच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाई केली. परंतु कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेच्या आजी-माजी अध्यक्षाविरुद्ध कारवाई करत असताना याबद्दल रिझर्व्ह बँकेला कळवणं आणि त्यांची परवानगी घेणं बंधनकारक असतं. मात्र, पुणे पोलिसांनी रिझर्व्ह बँकेला याची कल्पना न देताच ही कारवाई केली. यामुळं हे प्रकरण आता पोलिसांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

तसंच, अशा प्रकारची कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी महासंचालक, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांनाही अंधारात ठेवल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात गृहविभागाची कोंडी झाली असून एवढी मोठी कारवाई करण्यापूर्वी पुणे पोलिसांनी गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कल्पना दिली नसल्यानं मुख्यमंत्री नाराज झाले आहेत. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचं समजतं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत