रसायनी पाताळगंगा पुलावर पडलेल्या खड्डयांच्या विरोधात पत्रकार आनंद पवार खड्ड्यात बसून आंदोलन

प्रेस क्लबचा पाठिंबा

खोपोली : समाधान दिसले

रसायनी – पाताळगंगा हा औद्योगिक परिसर असल्याने पाताळगंगा पुलावरुन नेहमीच वाहनांची वर्दळ होत असते. मात्र या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने या ठिकाणाहून प्रवास करताना वाहनचालकांना त्रास होत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना ही घडत असताना प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या पुलावरुन मोठया प्रमाणात अवजड वाहतूक होत असते. तसेच या खड्डयांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात असून या ठिकाणाहून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच कामगार मोठया प्रमाणात ये-जा करत असतात. या ठिकाणचे खड्डे जवळपास अर्धा फूट मोठे झाले आहेत. यामध्ये पाणी साठल्याने या खड्डयांचा अंदाजही येत नसल्याने खडडयांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.

हा पूल अतिशय जीर्ण झाला असून या ठिकाणी सावित्री पुलासारखी दुर्घटना घडल्यास यास जबाबदार कोण ? अनेकवेळा वारंवार मागणी करुनही हे खड्डे बुजवले जात नसल्याने पत्रकार आनंद पवार व सामाजिक कार्यकर्ते यानी पाताळगंगा पुलावर पडलेल्या खड्डयांमध्ये बसूनअनोखे आंदोलन केले. या आंदोलनाला जिल्हा प्रेस क्लबचे अनिल भोळे, रसायनी प्रेस क्लबचे अध्यक्ष नागेश कदम, खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, उरण संघर्ष समितीचे गोपाळ पाटील, माजी सरपंच संदीप मुढे, पनवेलचे पंचायत समिती सदस्य जगदीश पवार, रोटरीचे सुनील भोसले वादळवार संपादक विजय कडू, चांभार्लीचे उपसरपंच दत्तात्रेय जांभळे, वासांबे उपसरपंच दत्तात्रेय शिंदे, माजी सरपंच सचिन तांडेल, दीपिका भंडारकर ज्ञानेश्वर पाटील, मनसेचे कुलचंद लोंढे, प्रमोद राईलक, अरुण मानकामे, यांच्यासह सर्व सामाजिक संघटना व मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

या आंदोलनाच्या दरम्यान एम. आय.डी.सीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र बेलगमवार उप अभियंता जाधव यांनी भेट देऊन रस्त्याची डागडुजी करून सुस्थितीत रस्ता करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत