रस्ते खोदून टाकली जातेय जीवोची केबल; सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

म्हसळा : निकेश कोकचा 

रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या जिओ केबल लाईन खोदकामात  ठेकेदाराने भर पावसात रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरु ठेवले असून आंबेत व  संदेरी या सात कि.मी. च्या परिसरात काही ठिकाणी ठेकेदाराने नव्याने तयार झालेल्या बागमांडला राज्यमार्गाची अक्षरशः दुरदर्शा करून  सोडली आहे. यामध्ये बऱ्याच ठिकाणी या ठेकेदाराने या केबल लाइन खोदकामासाठी चक्क रस्ताच खोदल्याचे चित्र आता समोर आले आल्याने परिसरातील नागरीकांनी याबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बऱ्याच ठिकाणी रास्ता संपूर्ण खचून गेला असल्याने अशा ठिकाणी वाहने घसरून जाण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. या परिसरात दुर्घटना होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून  संदेरी येथील काही ग्रामस्थ  ठेकेदारांवर कारवाईच्या मागणीसाठी आंबेत येथील पोलीस चेक पोस्ट मध्ये गेले होते.  तेथे या ठेकेदारांना बांधकाम विभागाने खोदकामाची    परवानगी दिली आहे हे पोलिसांनी ग्रामस्थाना सांगितले . पोलिस प्रशासन व ठेकेदार असे  सांगून ग्रामस्थांची दिशा भूल करीत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष या गोष्टीकडे पाहता हे जिओ केबल ठेकेदार ग्रामस्थांच्या सुरक्षिततेकडे धूळ चारत असल्याचा गंभीर आरोप आंबेत संदेरी येथील ग्रामस्थांनी केला आहे . अशा दंडेलशाही ठेकेदारांवर योग्य रित्या कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी नागरीकांकडून उपस्थित होत आहे .
आंबेत संदेरी रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला जिओ केबल लाइन खोदकाम भर पावसात सुरु असल्यामुळे रस्त्यावर चिखलाचा थर साचत असल्यामुळे या विभागात अनेक वाहने घसरून जात आहेत ,कोंकणातील पावसाचा विचार करता जमीन पूर्णपणे नरम पडली असल्याने रस्त्याला धरूनच सुरु असलेले हे खोदकाम वाहनाना साइड घेताना त्रासदायक ठरत असल्याने या विभागात अनेक वाहने या खोदकाम केलेल्या मातीत खचून जात आहेत,काही ठिकाणी खड्डे जैसे थे अवस्थेतच असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अब्रार झटाम युवक काँग्रेस म्हसळा तालुका  माजी अध्यक्ष
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.