रस्त्यावरील खड्डे आणि मातीच्या धुळीचा त्रास नागरिकांना

रसायनी (रायगड) : रायगड माझा वृत्त 

औद्योगिक क्षेत्रात पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे.  आशी नागरिकांची तक्रार आहे. दरम्यान, जाताना खड्डे आणि  मातीच्या धुळीचा त्रास नागरिकांना होत असल्याने एमआयडीसीच्या विरोधात नाराजी व्यक्त होत आहे. जलद गतीने डांबर टाकुन खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावेत आशी मागणी कारखानदार व नागरिकांनी केली आहे.

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील श्री सिध्देश्वरी ते बाँम्बे डाईन्ग या तसेच अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील श्री सिध्देश्वरी ते चावणे या मुख्य रस्त्यावरून कारखान्यांतील वाहन आणि औद्योगिक परीसरातील  गावांतील वाहनांची मोहोपाडा, पनवेल, कडे वर्दळ सुरू आसते. दरम्यान दोन्ही ठिकानी औद्योगिक क्षेत्रात रस्त्यावर खड्डे पडुन रस्त्याची दुरावस्था झाली आहे. एमआयडीसीने पावसाळ्यात ग्रीट व माती टाकुन खड्डे गणपती सणा आगोदर बुजविले आहे.

दरम्यान या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले आहे. तर जाताना खड्डे व उडणा-या मातीच्या धुळीचा  त्रास नागरिकांना होत आहे. डांबर टाकुन खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम कासवाच्या गतीने सुरू आहे असे शेखर जाधव, माधव पाटील यांनी सांगितले. पंधरा दिवसात डांबर टाकुन खड्डे बुजविले जातील असे एमआयडीसीचे अभियंता पोद्दार यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत