रांचीत एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या

राजधानी दिल्लीमधील बुराडीची पुनरावृत्ती 

रायगड माझा वृत्त

रांची – राजधानी दिल्लीमधील बुराडी येथे एकाच कुटुंबातील 11 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता रांचीमध्येही एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मूळ बिहारच्या भागलपूर येथील झा कुटुंबिय रांचीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते, सकाळी त्यांच्या राहत्या घरातच मृतदेह आढळले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सातही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आहे आहेत.

घरातील आर्थिक परिस्थिती मुळेत्यांनी आत्महत्या  केली असावी, अशी  प्राथमिक शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. सकाळी खूप वेळ दरवाजा बंद होता. त्यामुळे शेजाऱ्यांनी घरमालकाला याबाबत माहिती दिली आणि मालकाने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा सात लोकांचे मृतदेह आढळून आले. मृतांजवळ कोणतीही सुसाइड नोट आढळलेली नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत