राकेश रोशन यांना कॅन्‍सर, हृतिकची भावूक पोस्‍ट

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन

निर्माते-दिग्‍दर्शक राकेश रोशन कॅन्‍सरशी पीडित असून तो प्राथमिक स्‍टेजला आहे. हा खुलासा स्‍वत: हृतिक रोशनने सोशल मीडियावरून केला आहे.

ऋतिक रोशनने आपल्‍या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. राकेश रोशन यांना squamous cell carcinoma of the throat झाले असून आज त्‍यांची पहिली सर्जरी आहे. हृतिकने लिहिले आहे, आम्‍ही भाग्‍यवान आहोत की, आम्‍हाला त्‍यांच्‍यासारखा मार्गदर्शक मिळाला आहे.

बॉलिवूड इंडस्‍ट्री आणि रोशन कुटुंबीयांसाठी ही दु:खाची बाब आहे. परंतु, सर्वजण राकेश यांच्‍यासाठी प्रार्थना करत आहेत.

राकेश रोशन बॉलिवूडचे निर्माते-दिग्‍दर्शकांपैकी एक प्रसिध्‍द दिग्‍दर्शक आहेत. लवकरच ते हृतिकसोबत कृष-४ ची शूटिंगचे सुरुवात करणार आहेत. परंतु, आता त्‍यांच्‍यावर उपचार सुरू झाल्‍याने चित्रपटाची तयारी पुढे जाऊ शकते.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत