राखी सावंतचा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सल्ला; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

ड्रामा क्विन राखी सावंतने नुकताच फेसबूकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना शक्तिशाली म्हणाली आहे. ‘मी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सांगितलं होतं  एकमेकांसोबत भांडू नका. मोदीजी खूप शक्तिशाली आहेत आणि तुमच्या भांडणाचा फयदा भाजपने घेतला आहे. माझी मनापासून इच्छा होती तुम्हाला मुख्यमंत्री पदावर पाहण्याची.’ असं मत तिने व्हिडिओमध्ये मांडले आहे.

हा व्हिडिओ साध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये ती चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सल्ला देताना दिसत आहे. राज्यात रंगत असलेल्या राजकारणावर तिने वक्तव्य केलं आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीसोबत बंडखोरी करत शनिवारी सकाळी उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमुळे राखी सावंत पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत