राजकारण्यांसह अभिनेत्यांनी थकवले वाहतुकीचे दंड!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या घरी ई-चलन पाठवून दंड वसुलीचे निर्देश दिले जातात. मात्र अनेक जण अशी ई-चलन घरी आल्यानंतर दंडच भरत नाहीत. असा दंड थकवणाऱ्यांची मुंबई वाहतूक पोलिसांची यादी तपासाल, तर तुम्हाला धक्का बसेल. कारण वाहतुकीचे नियम मोडून दंड न भरणाऱ्यांमध्ये राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, अभिनेता सलमान खान यासारख्या दिग्गजांची नावं आहेत. मुंबई मिररने याबाबतचं वृत्त दिलं

आहे.वेगमर्यादा, सिग्नल न पाळणे, नो एण्ट्रीत गाडी घुसवणे, झेब्रा क्रॉसिंगचा नियम न पाळणे अशाप्रकारच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मुंबईकरांकडून वाहतूक पोलीस तब्बल 119 कोटी रुपये वसूल करणार आहे.ज्या मुंबईकरांना वाहतूक पोलिसांनी ई चलन पाठवलं आहे, त्यामध्ये अभिनेता सलमान खान, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची नावं आहेत.

इतकंच नाही तर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर वापरत असलेल्या गाडीचंही नाव या यादीत आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, कॉमेडीयन कपिल शर्मा, भाजप प्रवक्ते राम कदम यांनीही ई चलनद्वारे पाठवलेला दंड भरलेला नाही.मात्र या सर्वांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत किंवा चालकाने चुकून वेगमर्यादा ओलांडली असेल, असं स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच काहींनी आमच्यापर्यंत ई चलन आलंच नसल्याचं म्हटलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत