राजकीय फायद्यासाठीच भाजपने पीडीपीची संगत सोडली – रामदास आठवले

मुंबई : रायगड माझा 

केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या मित्रपक्षाला राजकीय फायद्यासाठीच भाजपने जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीशी असलेली युती तोडली असा घरचा आहेर दिलेला आहे. राजकीय फायद्यासाठीच तीन वर्षांपूर्वी भाजपने पीडीपीशी युती केली आणि आता राजकीय फायद्यासाठीच युती तोडली असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. २०१९ साली होणाऱ्या निवडणुकीत आपल्याला पीडीपीशी युती कायम ठेवल्यास फटका पडेल असा विचार करूनच भाजपने युती तोडली असेही रामदास आठवले म्हणाले आहेत.

भाजपवर सामनामध्ये जी टीका केली, त्यावरही त्यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, काश्मीरमध्ये भाजपने नाही तर पाकिस्तानने अराजक माजवले आहे, भाजपला त्याकरता दोषी ठरवणे चुकीचे आहे. जे काही दहशतवादी हल्ले झाले ते पाकिस्तान करत असल्यामुळे भाजपवर शिवसेनेची टीका चुकीची. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्यांनी भाजपशी युती केली पाहिजे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत