राजापूरजवळ भीषण अपघातात ५ जण ठार; ३ गंभीर जखमी

राजापूर : रायगड माझा ऑनलाईन

Image result for accident

मुंबई गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील वाकेड गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जण जागीच ठार झाले असून ३ ते ४ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समजते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजापूरनजीक महामार्गावर खाजगी बस आणि कारची धडक झाली. सकाळी ११च्या सुमारास हा अपघात झाला. यात ८ पैकी ५ जण जागीच ठार झाले तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. कोंडे येथील रहिवाशी मुंबईहून सिंधूदुर्गकडे जात असल्याचे समजते. या अपघातातील जखमींना रत्नागिरीतील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्यांपैकी दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत