राजीव सातव होणार महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष? 

महाराष्ट्र News 24 वृत्त 

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिल्याने या पदासाठी माजी खासदार राजीव सातव यांच्या नावाचा विचार सुरू झाला असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.

Image result for राजीव सातव होणार महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष ?"

 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा अगोदर विधानसभा अध्यक्षपदासाठी आणि नंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी झाली. मात्र या दोन्ही चर्चा चव्हाण यांच्या परस्पर झाल्या त्यांचे मत विचारात न घेता या पदासाठी त्यांचे नाव पुढे करण्यात आले. मात्र चव्हाण यांना या दोन्ही ठिकाणी काम करण्यात रस नव्हता. विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारण्यासही चव्हाण यांनी अनुकूलता दाखवली नाही. त्यामुळे राजीव सातव यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा द्यावी, असा विचार पक्षपातळीवर असल्याचे समजते. राजीव सातव हे २०१४ साली हिंगोली मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनंतर त्यांनी काँग्रेस संघटनेच्या कामकाजावर लक्ष देण्यास सुरुवात केली. ते सद्या गुजराजचे काँग्रेसचे प्रभारी म्हणून काम पाहात होते. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी  काँग्रेसकडून तिकीट वाटपाची मोठी  जबाबदारी राजीव सातव यांना देण्यात आली आहे . आता त्यांना महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद देण्याचा विचार केंद्रीय पातळीवर सुरू असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत