राजेश शृंगारपुरे पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात !

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मराठी बिग बॉसच्या घरात आणखी एका पाहुण्याची एण्ट्री होणार आहे. पण हा पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून, अभिनेता राजेश शृंगारपुरे आहे.

वाईल्ड कार्ड एण्ट्रीद्वारे राजेश शृंगारपुरेचं बिग बॉसच्या घरात पुनरागमन होणार आहे. आज किंवा उद्याच राजेश पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात दिसेल. रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांच्यातील जवळीकीमुळे मराठी बिग बॉसची प्रचंड चर्चा होती. शिवाय अश्लीलता पसरवल्याप्रकरणी राजेश आणि बिग बॉसवर गुन्हाही दाखल झाला होता. सगळ्या नाट्यमय घडामोडींमुळे राजेश शृंगारपुरेला 20 मे रोजी बीग बॉसच्या घरातून डच्चू मिळाला होता.

परंतु आता चार आठवड्यानंतर राजेश पुन्हा बिग बॉसच्या घरात दाखल होणार आहे. राजेश स्पर्धेत पुन्हा सहभागी झाला आहे की काही दिवसांसाठी घरात येणार आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. याआधी हर्षदा खानविलकर, शर्मिष्ठा राऊत, नंदकिशोर चौगुले, त्यागराज खाडिलकर यांची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली होती. त्यापैकी हर्षदा पाहुणी म्हणून केवळ आठवड्याभरासाठी सहभागी झाली होती. तर शर्मिष्ठा, नंदकिशोर आणि त्यागराज स्पर्धक म्हणून सहभागी झाले. मात्र घरातून बाहेर झालेल्या एखाद्या स्पर्धकाची वाईल्ड कार्डद्वारे एण्ट्री होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत