म्हसळा : निकेश कोकचा
राजे प्रतिष्ठान, रायगड चे संस्थापक अध्यक्ष सोनल गोलावंडे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य मार्गदर्शन शिबीर रविवार दि 29 जुलै 2018 रोजी नालासोपारा पूर्व येथे आयोजित केले होते. या शिबिराला वीणा कालामांचाचे निर्माते गोविंद गोरीवले, भाजप माथाडी अध्यक्ष संदीप शिरवनकर, मनसे शहर अध्यक्ष संजय मेहरा, मनसे म्हसळा श्रीवर्धन अध्यक्ष शेखर सावंत, अनंत फिलसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या शिबिरात आरोग्या विषयी माहिती, आजारावर कशा प्रकारे मात करावी, बदलती जीवनशैली या आणी अनेक आरोग्य विषयी माहिती देण्यात आली. या शिबिरात बहुसंख्य नागरिकांनी उपस्थिति दर्शवली.सदर शिबीर योग्यरीत्या पार पाडण्यासाठी उपअध्यक्ष सुरज खापरे, सचिव विकास आंबेकर, उप सचिव नयन बेर्डे, स्वप्नील शिर्के, अमोल जावळे, आशिष शिंदे, निखिल बोर्ले, शशिकांत पवार, करण धोकते, तेजस खाडे, भूषण मोरे, किरण पाटेकर आणी इतर सर्व सभासदांनी मेहनत घेतली.
शेयर करा