राज्यपाल काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ देतील असं वाटत नाही -संजय राऊत

मुंबई – कर्नाटकमधील त्रिशंकू परिस्थितीमुळे आता सत्ता स्थापनेचा निर्णय राज्यपाल वजुबाई वाला यांच्या हातात आहे. राज्यपाल वजुबाई वाला सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती सोपवणार, याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. दरम्यान, राज्यपाल पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला. तर दुसरीकडे, राज्यपाल काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ देतील असं वाटत नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
Image result for sena mp sanjay raut

“कर्नाटकात राज्यपालाची भूमिका महत्त्वाची आहे. राज्यपाल आरएसएसचे आहेत. त्यामुळे राज्यपाल काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ देतील असं वाटत नाही”, असे संजय राऊत यांनी म्हटलंय. शिवाय, ”२०१९च्या निवडणुकांमध्ये भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार नाही”, असा दावादेखील संजय राऊता यांनी केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत