राज्यभरात ‘पानी फाऊंडेशन’चं महाश्रमदान

मुंबई : महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून राज्यभरात महाश्रमदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातल्या काही भागात महाश्रमदानाला प्रत्यक्षात सुरुवातही झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच या श्रमदानासाठी शहरांमधून एक लाखाहून अधिक जण गावखेड्यांकडे श्रमदानासाठी जाणार आहेत.महाश्रमदानामध्ये राज्यभरातील राजकीय नेते, मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील कलाकारही सहभागी होणार आहेत. उद्योग जगतातील मोठी मंडळीही श्रमदानासाठी हातभार लावणार आहेत. श्रमदानात सहभागी होण्याचं आवाहन अभिनेता आमीर खानने केलं आहे.
                  
लातूरमध्ये आमिर खान आणि अभिनेत्री आलिया भट्ट कुदळ-फावडं घेऊन महाश्रमदानात सहभागी होत आहेत. नाशिकमध्ये किरण राव, सत्यजित भटकळ, अनिता दाते (माझ्या नवऱ्याची बायको फेम राधिका) सहभागी झाले आहेत.

याशिवाय सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री, गिरीश कुलकर्णी, स्पृहा जोशी, सुनिल बर्वे, अमेय वाघ, अलोक राजवाडे-पर्ण पेठे हे कलाकारही विविध ठिकाणी महाश्रमदान करत आहेत.
सकाळी सहा ते आठ आणि संध्याकाळी चार ते सात अशा दोन भागांमध्ये महाश्रमदान करण्यात येणार आहे. यासाठी श्रमदानाच्या साहित्यांचे तब्बले 13 हजार सेट तयार ठेवण्यात आले आहेत. कुदळ, फावडे आणि तीन टोपल्यांचा मिळून एक सेट तयार करण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत