राज्यमंत्री पदाचा काय उपयोग असतो, तुम्हांला दाखवून देऊ!

कऱ्हाड : रायगड माझा

राज्यमंत्री पदाचा काय उपयोग असतो , हे तुम्हांला दाखवून देऊ, असं श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले म्हणाले.श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची कामे शासनस्तरावर जलदगतीने मार्गी लागावीत, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतुल भोसलेंना राज्यमंत्री पदाचा दर्जा देऊ केलेला आहे.

भाजपची सत्ताच राहणार नाही तर राज्यमंत्री दर्जाचा उपयोग काय? राज्यमंत्री पदाच्या दर्जाला काहीही अधिकारच नसतो. ज्यांना अधिकार नाही, अशी पदे वाटून तरी काय उपयोग, असा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी भोसलेंना लगावला होता. त्याला प्रत्युतर देतांना राज्यमंत्री पदाचा काय उपयोग असतो, हे तुम्हांला दाखवून देऊ, असं भोसले म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत