राज्यसभेचे उपसभापती म्हणून झारखंडचे वरिष्ठ पत्रकार हरिवंश नारायण सिंह यांची नियुक्ती

हरिवंश यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बीके हरिप्रसाद यांचा २० मतांनी पराभव केला

रांची : रायगड माझा वृत्त

राज्यसभेच्या उपसभापतीसाठी झालेल्या निवडणूकीत झारखंडचे वरिष्ठ पत्रकार हरिवंश नारायण सिंह सर्वाधिक मतांनी निवडून आले. गुरूवारी उपसभापती म्हणून हरिवंश यांची निवड झाल्यावर राज्यसभेत फार खेळीमेळीचं वातावरण होतं. राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबतच सर्वसामान्य जनताही हरिवंश यांना शुभेच्छा देत होती. मुख्यमंत्री रघुवीर दास यांनीही ट्विटरच्या माध्यमातून हरिवंश यांना शुभेच्छा दिल्या. दास यांनी ट्विट करत म्हटले की, राज्यसभेच्या उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएला यश मिळालं. नवनिर्वाचित उपसभापती हरिवंश सिंह यांना मनःपूर्वक शुभेच्छा.

राज्यसभेचे उपसभापती म्हणून हरिवंश नारायण सिंह यांची नियुक्ती

हरिवंश हे झारखंड येथील प्रभात खबरचे प्रिन्सिपल एडिटर होते. ते माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे सल्लागारही होते. राज्यसभेत ते जेडीयूचे सदस्य आहेत. गुरूवारी सकाळी झालेल्या मतदानात हरिवंश मोठ्या प्रमाणात विजयी झाले. हरिवंश यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बीके हरिप्रसाद यांचा २० मतांनी पराभव केला. हरिवंश यांना १२५ मतं मिळाली तर हरिप्रसाद यांना १०५ मतं मिळाली. काँग्रेसने उपसभापतीच्या निवडणूकीसाठी बीके हरिप्रसाद यांना मैदानात उतरवले होते. तर एनडीएने हरिवंश सिंहला पाठिंबा दिला. शिवसेना आणि भाजपने हरिवंश यांना समर्थन दिल्यावर सिंह यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत