राज्यसभेच्या उपाध्यक्षपदासाठी भाजपाचे एकमतासाठी प्रयत्न

नवी दिल्ली : रायगड माझा 

 राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी सर्वांच्या सहमतीने नियुक्ती व्हावी यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत. भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेत सर्वाधीक सदस्य असले तरी बहुमत नसल्यामुळे सत्ताधारी पक्षाला इतर पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.  1 जुलै रोजी पी. जे. कुरियन यांचा उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवा उपाध्यक्ष कोण याची चर्चा सुरु झाली आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सत्ताधारी व विरोधकांना सर्व सहमतीने कुरियन यांच्या जागी योग्य व्यक्तीची नेमणूक करावी आसे आवाहन केले आहे.

या पदासाठी भारतीय जनता पार्टी अकाली दलाचे नरेश गुजराल यांचे नाव पुढे करेल अशी चर्चा आहे. त्यांना बिजू जनता दलाची साथ मिळेल असे सांगण्यात येते. यापुर्वी रालोआमध्ये नसलेल्या बिजू जनता दलाच्या खासदाराची या पदावर नियुक्ती व्हावी यासाठी भाजपाचे प्रयत्न होते. कुरियन आणि इतर अनेक मंत्री व खासदारांशी आपल्या निवासस्थानी बोलताना व्यंकय्या नायडू यांनी उपाध्यक्षपदासाठी निवडणूक टाळण्याचे आवाहन केले.

सरकार व विरोधी पक्षांनी सर्व सहमतीने निवड करावी असे त्यांनी सुचवले. असे असले तरी काँग्रेस याची चर्चा यूपीएचे सदस्य पक्ष व इतर विरोधीपक्षांशी करेल अशी शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसने भावी उपाध्यक्ष हा काँग्रेसचा नसावा यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 18 जुलै रोजी संसदेचे मॉन्सून अधिवेशन सुरु होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत