राज्यसेवेच्या ३४२ पदासांठी भरती; मराठा समाजाला राखीव जागा

पुणे : रायगड माझा ऑनलाईन 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षेची ३४२ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणानुसार या भरतीमध्ये मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गातून १६ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

एकूण ३४२ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा १३, १४ आणि १५ जुलै २०१९ रोजी घेण्यात येईल. परीक्षेसाठी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

उपजिल्हाधिकारी पदासाठी ४० जागा, पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त पदासाठी ३४जागा, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा पदासाठी १६ जागा, उद्योग उप संचालक, तांत्रिक पदाच्या ०२ जागा, तसेच तहसिलदार पदाच्या ७७ जागा, उपशिक्षणाधिकारी अथवा महाराष्ट्र शिक्षण सेवा पदाच्या २५ जागा आहेत.

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी ०३ जागा, कक्ष अधिकारी १६ जागा, सहायक गट विकास ११ जागा, उद्योग अधिकारी, तांत्रिक ०५ जागा, तसेच नायब तहसिलदार ११३ अशा विविध पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत