राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन

मुंबई : रायगड माझा 

राज्याचे कृषीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर याचं आज पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. मुंबईतील सोमय्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. फुुंडकर यांच्या पार्थिवावर खामगाव येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. थोेड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही मंत्री रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आहेत. फुंडकर यांच्या पार्थिवावर आज खामगाव येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याने फुंडकर यांचं निधन झाले. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे शेती प्रश्नाची जाण असलेला नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

पांडुरंग फुंडकर यांनी सलग तीन वेळेस अकोला लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. १९८९ मध्ये पहिल्यांदा त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. वर्ष १९९१ ते १९९६ यादरम्यानच्या काळात त्यांनी भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. महाराष्ट्र विधानसभेवर १९७८ आणि १९८० साली निवडून गेले होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात २०१६ मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. राज्यात भाजपा वाढवण्यासाठी फुंडकर यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासह मोठे प्रयत्न केले. भाजपाला ग्रामीण भागाता जनाधार मिळवून देण्यात फुंडकर यांचा मोठा वाटा राहिला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत