राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे; ऊर्जा मंत्र्यांकडून बोनस जाहीर

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

ऐन दिवाळीत वीज कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिल्याने नागरिकांची दिवाळी अंधारात जाणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र वीज कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर करण्यात आला आहे. तर आता वीज कर्मचाऱ्यांचा संप होणार नाही त्यामुळे वीज ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.

“लॉकडाऊनच्या काळात वीज पुरवठा करण्यात, निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेली वीज यंत्रणा उभारण्यात आणि ठप्प झालेला मुंबईचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात ऊर्जा विभागाने मोठी भूमिका बजावली. हीच बाब लक्षात घेऊन ऊर्जा विभागाच्या कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोनसची दिवाळी भेट जाहीर केल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्र्यांनी दिली”.

दरम्यान बोनसची रक्कम ही गेल्या वर्षी इतकीच असणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १५ हजार तर विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक यांना प्रत्येकी ९ हजार रुपये बोनस मिळाणार आहे.

तर नितीन राऊत यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये अस म्हंटले आहे की, “वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा तत्वतः निर्णय मी घेतला असून रकमेची घोषणा आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये करण्यात येईल. सर्व संघटनांनी आपला संप रद्द करून वीज ग्राहकांना त्रास होईल, असे कृत्य करू नये असे आवाहन मे करीत आहे!”

“महावितरणमधील 7500 पदांवरील नियुक्ती पत्र जारी करण्याचे आदेश मी आज ऊर्जा विभागाला दिले आहेत. उपकेंद्र सहाय्यक, पदवीधर आणि पदविकाधारक शिकाऊ अभियंता, ज्युनियर इंजिनिअर, आदी पदांवरील नियुक्तीचे आदेश लगेच जारी होतील.” अशी माहिती देखील त्यांनी ट्विटद्वारे दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत