राज्यातील 1.50 लाख राजपत्रीत अधिकारी देणार एक दिवसाचा पगार

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील राजपत्रीत अधिकारी महासंघाने केरळ राज्यातील पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या पुरग्रस्तांसाठी राज्यातील सुमारे दिड लाख अधिकारी आपला एक दिवसाचा पगार देणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तसेच भारतीय नागरिक व मानवतेच्या दृष्टीकोनातून मदतकार्यासाठी अर्थसहाय म्हणून राज्यातील दीड लाख राजपत्रित अधिका-यांच्या ऑगस्ट महिन्याच्या पगारातून एका दिवसाचा पगार देणार आहेत. या एक दिवसाच्या पगाराची रक्कम परस्पर कापून घ्यावी, असा प्रस्ताव अधिकारी महासंघाने दिला असल्याची माहिती महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे व सरचिटणीस समीर भाटकर यांनी दिली आहे.


शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत