राज्यात थंडीने हुडहुडी; परभणीत पारा नीचांकी ५.१ अंशावर

महाराष्ट्र News 24

राज्यात थंडीने हुडहुडी भरलेली पाहायला मिळत आहे. थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सर्व व्यवहार उशिराने सुरू होत आहेत. परभणी जिल्ह्यात तापमानातील घसरण सलग तिसऱ्या दिवशी सुरूच असून, मंगळवारी ५.१ अंश नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. १९ डिसेंबरपासून तापमानात बदल होण्यास प्रारंभ झाला. १२.३ अंशावर पारा थेट ७ अंशापर्यंत घसरल्याने जिल्हाभरात वातावरण गारठले आहे. पहाटेच्या सुमारास थंडीसह धुक्याची चादर पसरत आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत थंडीचा असर रहात असून, सायंकाळी ६ वाजेनंतर रस्त्यांवरील वर्दळ कमी होत आहे.

उत्तरेकडील राज्यांत थंडीची लाट निर्माण झाल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणावर झाला आहे. राज्यातील नीचांकी तापमाना जिल्ह्यात नोंद केले जात आहे. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने २२ डिसेंबर रोजी घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात ५.१ अंश किमान तापमान राहिले आहे. हे तापमान या वर्षीच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान ठरले आहे. आणखी काही दिवस तापमानात घट होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तविली आहे.

असा घसरला पारा

१९ डिसेंबर : १२.३ अंश

२० डिसेंबर : ७ अंश

२१ डिसेंबर : ५.६ अंश

२२ डिसेंबर : ५.१ अंश

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत